Ticker

6/recent/ticker-posts

नेर तलावात पाणीसाठा वाढला; कृषी पंप सुरू करा : धीरज जाधव



बुध दि [प्रतिनिधी ] 

 पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने नेर तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणारे सर्व कृषी पंप मे महिन्याच्या अखेरीस बंद केले होते. या फिडरवर पुसेगाव, वर्धनगड व परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके अवलंबून आहेत. सध्या नेर तलावात पुरेसा पाणीसाठा झाला असल्याने कृषी पंपांना पाणी उपसा करण्यासाठी तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी पुसेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज जाधव यांनी केली आहे.

सध्या नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेद्वारेही पाणी नेर तलाव येथे येत आहे. याच तलावातून पाणी माण तालुक्यातही जात आहे.

तरीही या तलावातील पाण्याच्या आधारे शेती करणाऱ्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंप शासनाच्या आदेशानुसार अद्यापही बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या पाऊस पडत असला तरी काही शेतकऱ्यांनी भांडवली नगदी पिके घेतली आहेत. या पिकांच्या वाढीसाठी पिकांना ड्रिपद्वारे खते देणे, औषध फवारणी करणे गरजेचे आहे.     

नेर तलावात पाणी उपसा करण्यास मनाई करण्यात आल्याने कित्येक दिवस बंद कृषी पंप नादुरुस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नेर तलावातील पाणी तातडीने उपसण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. समर्थ पवार, वर्धनगड, शेतकरी