Ticker

6/recent/ticker-posts

दिनेश फडतरे यांच्या *आट्टील माणसं* या लेख संग्रहाला मेहकर (बुलढाणा )येथील राज्यस्तरीय ग्रामनाथ साहित्य पुरस्कार जाहीर. -


 बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी द्वारा आयोजित राज्यस्तरीय ग्रामनाथ पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आलेत...या पुरस्कारासाठी दिनेश फडतरे यांच्या संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आट्टील माणसं या ललित लेख संग्रहाची निवड करण्यात आली..

महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभर पुस्तकामधून ही निवड करण्यात आली...अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार, लेखक भगवान राईतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.सप्टेंबर महिन्यात मेहकर येथे होणाऱ्या पाचव्या साहित्य जगत मराठी साहित्य संमेलनामध्ये पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येईल...हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून दिनेश फडतरे यांचे अभिनंदन होतं आहे..