ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
मुखेड तालुक्यातील ग्राम खरब खंडगाव येथे दि.१ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न साहित्य सम्राट साहित्याचे बादशहा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमित्त क्रांतीचे प्रतीक असलेल्या लाल ध्वजाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ठिक ९:३० वाजता जुने गाव अण्णा भाऊ साठे सभागृह येथील ध्वजारोहण गावातील भूमिपुत्र आदर्श सेवानिवृत्त शिक्षक माजी सरपंच सन्माननीय पांडुरंगजी आनंदराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. ठिक १० वाजता डॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक, साठे नगर, नवी आबादी येथील पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार, ध्वजारोहण गावातील प्रथम नागरिक तथा प्रशासक सौ.सुलभाताई शिवाजीराव काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. विशेष.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने "लेखन प्रेरणा दिन" साजरा करा म्हणून घोषित केल्यामुळे जि.प.के. प्राथमिक शाळा खरब खंडगाव येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी यांची हस्ताक्षर स्पर्धा घेऊन लेखन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.आपल्या गावातील भूमिपुत्र आदर्श शिक्षक सन्माननीय पांडुरंग पा जाधव यांची सेवापूर्ती सन्मान सोहळा संपूर्ण गावकरी मंडळी च्या वतीने संपन्न झाला.यावेळी सरपंच, ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष,सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, माजी चेअरमन आपल्या गावातील भूमिपुत्र मातंग समाजाची अस्मिता सन्माननीय एपीआय साहेब यांचीही शेवटी उपस्थिती लाभली.जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष,माजी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष,माजी सर्व पोलीस पाटील.जि. प. कें. प्रा. शाळा खरब खंडगाव येथील मुख्यध्यापक सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक आदि उपस्थित होते.





Social Plugin