Ticker

6/recent/ticker-posts

भूम शहराचा पथदिव्यांचा प्रश्न अखेर मार्गी; नव्या कामाचा प्रभाग क्र. १ मधून विधिवत शुभारंभ




आसिफ शेख @ प्रतिनिधी 

शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पथदिव्यांचा (लाईट) प्रश्न अखेर सुटला असून, प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मे. बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा. लि. व विन्सी ग्लोबल प्रा. लि. (जे.व्ही.) यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाईट टेंडरच्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक १ मधून विधिवत करण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात भूमनगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे, उपनगराध्यक्षा साठे ताई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुंकूपूजन करून करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था व्हावी आणि अंधाराचे साम्राज्य दूर व्हावे यासाठी नागरिक बऱ्याच दिवसांपासून या कामाची वाट पाहत होते.

​कामाचा प्रत्यक्ष नारळ फुटल्याने संपूर्ण भूम शहर लवकरच लखलखणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या कामाच्या यशस्वी सुरुवातीबद्दल नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय टीमचे शहरवासीयांकडून मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात येत आहे.

​याप्रसंगी सर्व नगरसेवक, विविध राजकीय-सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.